2019 मध्ये  पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी गुलाल उडवत जल्लोष केला.

पुणे: 2019 मध्ये  पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा झाली होती  कोरोनामुळे निकाल लांबला होता आणि आज हा निकाल जाहीर झालाय. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी  गुलाल उडवत जल्लोष केला.

यावेळी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी महेश बदडे म्हणाले,आज आम्हाला खूप आनंद होत आहे. आज स्पर्धा परीक्षा अभ्यास करणार विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.2019 मध्ये  पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा झाली होती  कोरोनामुळे निकाल लांबला होता आणि आज हा निकाल जाहीर झालाय.जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये निवडून अधिकारी झाले आहेत.त्याचे आम्ही अभिनंदन करतो. त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही आज गुलाल उधुन आनंदोत्सव करत आहोत.महेश बदडे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: