Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

दलित उद्योजक मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावेत- थावरचंद गेहलोत

पुणे : देशामध्ये मोठ्या प्रमाणात दलीत उद्योजक निर्माण झाले पाहिजेत ते काम पद्मश्री मिलिंद कांबळे हे दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या माध्यमातून करीत आहेत .असे मत कर्नाटक राज्याचे राज्यपाल महामहिम थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केले . ते आज पुणे
दौऱ्यावर असताना दलित  इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या मुख्य कार्यालयास अनौपचारीक भेट देण्यासाठी आले होते .

पुढे ते म्हणाले ,की दलीत इंडीयन चेंबर हे नवीन उद्योजक घडविण्यासाठी शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम राबवित आहे .यासाठी मी आपल्या सोबत सहकार्य करण्यास सदैव प्रयत्नशील असणार आहे. 
यावेळी त्यांचे स्वागत दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले .यावेळी डीक्कीच्या पुणे सभासद आणि उद्योजक यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली .यावेळी त्यांनी प्रत्येक उद्योजक यांच्याशी परिचय करून ,संबधित उद्योजकांच्या व्यवसायाचे स्वरूप आणि इतर माहिती घेत चर्चा केली .
या वेळी पद्मश्री मिलिंद कांबळे , रवींद्र नारा राष्ट्रीय अध्यक्ष, सीमा कांबळे महीला विंग प्रमुख , डिक्की पश्चिम महारष्ट्र अध्यक्ष,संजीव डांगी , अविनाश जगताप ,अनिल होवाळे पुणे अध्यक्ष ,मुकुंद कमलाकर,एन.जी खरात ,निवेदिता कांबळे ,प्राजक्ता गायकवाड यासह निवडक दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading