कृष्णाला दिलेलं वचन पूर्ण करू शकेल का राया?

झी मराठीवरील मन झालं बाजींद या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेचं रंजक कथानक प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवतंय. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि कृष्णा अगदी चांगल्या मार्कांनी सी.ए.ची परीक्षा पास होते त्यामुळे तिचा गावात अगदी जल्लोषात सत्कार होतो. संपूर्ण गावात कृष्णाच्या यशाचा आनंद साजरा होतोय. तिच्या पास होण्यामुळे रायाला देखील खूप आनंद झाला आहे पण कृष्णाला रायासोबत तिचं लग्न लावून तिला विधात्यांच्या घरी का आणलं याचं सत्य कळलं असल्यामुळे ती रायावर रागवून घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे राया तिच्यासोबत हा आनंद साजरा करू शकत नाही आहे. पण कृष्णाच्या या यशाबद्दल राया तिला एक गिफ्ट देतो. राया कृष्णाला एक स्कुटी गिफ्ट म्हणून देतो पण कृष्णा या गिफ्टचं स्वीकार करत नाही. तर याऊलट रायाने तिला विधात्यांच्या घरी सन्मानाने परत नेण्याचं वचन दिलं होतं त्या वचनाची कृष्णा त्याला आठवण करून देते आणि ते वचन जर त्याने पाळलं तर तिला जास्त आनंद होईल असं देखील म्हणते. तेव्हा राया कृष्णाला दिलेलं वचन पूर्ण करू शकेल का? कृष्णा पुन्हा सन्मानाने विधात्यांच्या घरी जाऊ शकेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल

Promo Link – https://www.instagram.com/p/CaykRGCrfLX/?utm_source=ig_web_copy_link

Leave a Reply

%d bloggers like this: