आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली हिला विजेतेपद

नागपुर : नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली हिने एकेरी गटाचे विजेतेपद संपादन केले. 
 
नागपूर,रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर पार।पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत पहिला सेट एमिलीने सहजा विरुद्ध 6-4 अशा फरकाने जिंकून आघाडी घेतली. पण याच क्षणी एमिली सामना खेळत असताना कोर्टवर घसरल्याने दुखापत झाल्यामुळे तिने माघार घेतली व त्यामुळे सहजाला विजय मिळाला. मागील आठवड्यात अहमदाबाद येथील स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या एमिलीला सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. 
 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरसेविका डॉ. प्रणिती फुके, आर्यन पंप्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार, एनडीएचटीएचे अध्यक्ष कुमार काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक भिवापुरकर, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, एमएसएलटीएचे खजिनदार व स्पर्धेचे संचालक सुधीर भिवापूरकर, विदर्भा इन्फोटेकचे अध्यक्ष प्रशांत उगेमुगे, विजय नायडू, विक्रम नायडू, डॉ दर्शन दक्षिणदास, गणेश पागे, बेहराम पटेल, शिव मोर आणि अली पंजवानी आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: अंतिम फेरी: 
सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि.एमिली सेबोल्ड(जर्मनी)[3] 4-6, सामना सोडून दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: