वीर माता भगिनी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेसाठी काम करा : अतुल खूपसे पाटील

करमाळा : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे नेहमीच अधोरेखित आहे. स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे पुरुषाच्या मनगटात बळ निर्माण होते आणि तो परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी करतो. छत्रपती शिवाजी राजांना जिजाऊंनी घडविले, महात्मा फुले यांना सावित्रीमाईंनी साथ दिली, राजमाता अहिल्यादेवी यांनी राज्यकारभार केला, कर्मवीर भाऊराव पाटील यांना लक्ष्मीबाईंनी साथ दिली या आणि अशा प्रकारे अनेक महिलांचे योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे. त्यामुळे या वीर माता भगिनींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या प्रश्नांसाठी कार्य करत रहा असे प्रतिपादन ‘जनशक्ती’चे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी केले.

करमाळा तालुक्यातील सोगाव व दिवेगव्हाण येथे जनशक्ती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महिला आघाडी तालुका प्रमुख दीपाली ताई डिरे, उपप्रमुख, कोमल खाटमोडे, रेखा नगरे, छाया नगरे, मंडूबाई गमले, सुनिता कोळी, रंजना नगरे, शारदाबाई राऊत, जनाबाई नगरे, केसरबाई सरडे, अलकाबाई सरडे, शशिकला गोसावी, दिपाली शिंदे, सविता शिंदे, छाया खाटमोडे, पूजा खाटमोडे, विद्या शिंदे, रंजना शिंदे, पुतळाबाई शिंदे, रत्‍नाबाई मोरे, कविता महाडिक, लोचना मोरे, केशर मोरे, आशाबाई खाटमोडे, लता महाडिक, रेखा मोरे, शोभा जाधव, सत्यभामा मोरे, बेबीताई पाडुळे, कलींदा खाटमोडे, कौशल्या खाटमोडे, कविता सुपेकरयांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

%d bloggers like this: