ओबीसी आरक्षणा शिवाय महानगरपालिका निवडणुका नको हीच आमची भूमिका – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे:ओबीसी समाजाचे आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने नाकारले आहे. येण्याऱ्या महानगरपालिका निवडणूकित ओबीसी समाजाला आरक्षणाशिवाय लढावे लागणार आहे त्यामुळे ओबीसी समाज हा नाराज झाला आहे. त्यावर कालच्या चर्चेत मध्य प्रदेशच उदाहरण घेत आपल्या राज्यात काय करता येईल असा विचार सुरू आहे.त्यासाठी सरकार म्हणून ज्या गोष्टी करायला हव्यात त्या आम्ही केल्या आहेत.येत्या ३ ते ४ महिन्यात डेटा गोळा करण्यासाठी प्रयत्न करू.आरक्षण शिवाय महानगरपालिका निवडणुका नको हीच आमची भूमिका आहे . असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे कुकडी प्रकल्पच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली. तेव्हा त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, ओबीसी समाजाला लवकर आरक्षण भेटावे म्हणून आम्ही बीसी आरक्षणासाठी एक नवीन आयोग आम्ही नेमत आहोत. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिल्या आहेत .सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दाखवल्या आहेत त्या सुधारून पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जायचं आहे .असे अजित पवार म्हणाले.
राज्यातील महानगरपालिकेची मुदत येत्या 15 मार्च ला संपत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले,जिथे गरज आहे तिथं अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील.विकासकामे कुठच थांबणार नाही. असे अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात विविध कामांचे उद्घाटन करायला येत आहेत. शरद पवार आणि अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर व्यासपीठावर असतील .का हा प्रश्न सगळ्यांना पडत आहे त्यावर अजित पवार म्हणाले,उद्या पंतप्रधान येत आहेत मी तिथं आहे सुभाष देसाई मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून येत आहोत.
अजित पवार व्यासपीठावर असले .तरी पुण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मोदींना विरोध दर्शवला आहे .त्यावर अजित पवार म्हणाले,एवढा कार्यक्रम झाल की मी यावर बोलेन. असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले,आज vit ची बैठक आज २ महिन्यानंतर पार पडली.राज्याचा ऊस लवकर कसा जाईल असे आदेश राजेश पाटील यांना दिला आहे.
कुकडीची पाच धरणे जे पुणे जिल्ह्यात आहे .त्याच पाणी अनेक तालुक्यांना जाते.शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाहीत. असे अजित पवार म्हणाले.
आज कर्जत जामखेड मधील नगर पंचायती मधील अनेक भाजपच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला .त्यावर अजित पवार म्हणाले,नगर आणि कर्जत तालुक्यातील अनेकांनी पक्ष प्रवेश झाला आहे.
नबाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप करत आहे .त्यावर पवार म्हणाले,त्यांच्या संदर्भात शरद पवार आणि जयंत पाटील हेच उत्तर देतील.
