नागराज मंजुळेच्या हलगीवर पुणेकरांनी धरला ठेका

मेगास्टार अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ हा महाराष्ट्रात 100% क्षमतेसह प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाचा ग्रँड स्पेशल प्रीमियर आज पुण्यात पार पडला. ‘झुंड’ चित्रपटाला सिने-प्रेक्षक, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रासह सर्वच स्तरातून दाद मिळाली. ही उत्कृष्ट कलाकृती तयार करण्यात आलेले खरे संघकार्य स्पष्टपणे दिसून येते. ‘झुंड’ टीम पुण्यात ढोल-ताशेच्या तालावर नाचताना आणि आनंद लुटताना दिसली. भव्य आणि प्रभावी प्रीमियरला नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर आणि संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांच्यासह कुटुंब, मित्र आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘झुंड’ हा चित्रपट एका फुटबॉल प्रशिक्षक आणि त्याच्या टीमच्या प्रवासाच्या अनोख्या कथेवर आधारित आहे. चित्रपटातील प्रशिक्षकाचा उद्देश हा आहे की, वंचित मुलांना दु:खी पार्श्वभूमीतून एकत्र करणे आणि त्यांना जगण्यासाठी एक नवीन उद्देश देणे जेणेकरून ते त्यांचे जीवन बदलू शकतील.
‘झुंड’ हा चित्रपट आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज हिरेमठ, राज हिरेमठ, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, मीनू अरोरा आणि संदीप सिंग यांनी टी-सीरीज, तांडव फिल्म्स एंटरटेनमेंट आणि आटपाट यांच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. झी स्टुडिओज हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: