Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पंतप्रधानांचा पुणे दौरा : राष्ट्रवादी काँग्रेस मूक आंदोलन करून निषेध व्यक्त करणार 

पुणे : उद्या (दि. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. मात्र, मी आज फेसबुक लाईव्ह द्वारे सदर मेट्रो मार्गाची पाहणी केली. अवघ्या पाच किलोमीटरच्या या मेट्रो मार्गाचे काम अर्धवट स्वरूपात असून, हे काम पूर्ण होण्यास किमान तीन महिने लागतील. असे असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमिचा अपमान केला असून उद्या त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या घटनेच्या निषेधार्थ उदया पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकाळी १०.०० वा. मूक आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

मोदी ज्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे त्या एस एन डी टी कॉलेज जवळील स्टेअरकेस, पत्रे ,प्लास्टर, पेंटिंग, वेल्डिंग, रेलिंग ही सर्वच काम अर्धवट परिस्थितीत आहे. ही काम पूर्ण नाही झाली तर पुणेकर ही मेट्रो वापरू शकत नाहीत.  मेट्रोच्या कामाची अत्यंत दयनीय परिस्थिती असताना ,निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांची फसवणूक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवण्यात येत आहे. मुळात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील निवडणुकांमधून मोदींनी युक्रेन मध्ये अडकलेल्या मुलांसाठी वेळ काढला नाही, परंतु अर्धवट स्वरूपात असलेल्या मेट्रोसाठी वेळ काढला. यावरून निर्दयी भाजपची कामकाजाची पद्धत आपणा सर्वांना दिसून येते, असेही जगताप म्हणाले.

तसेच २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून सातत्याने सरकारमधील विविध घटक मंत्री, राज्यपाल सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या राज्यघटनेचा अवमान करत आहे, दलितांचा आवाज वारंवार दाबण्याचा प्रयत्न होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमिचा अपमान करत आहे आणि पुन्हा त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुण्यात अनावरण होत आहे, या घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading