ज्यांना टीका करायची असेल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा – मुरलीधर मोहोळ

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 तारखेला पुणे दोऱ्यावर येत आहेत.विरोधी पक्षानी नरेंद्र मोदी हे पुण्यात आल्यानंतर काळे झेंडे दाखवुन आंदोलन करणार आहेत.त्यावर विरोधाकाना  जे करायचे ते करू दे आम्ही प्रत्येकाला कार्यक्रमाला बोलवण्याचे काम केले आहे. पुणे करांच्या हीतासाठी हे  कार्यक्रम होत आहे. ज्यांना टीका करायची असेल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. अशी  टीका महापौर मुरलीधर मोहोळ आज पुण्यात एम आय टी कॉलेज येथे नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तेथील आढावा घेण्याकरता आले असता त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली.

महापौर मुरलीधर मुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. पुणेकरांचे जे मेट्रो होण्याचे स्वप्न होते .
ते या रविवारी पूर्ण होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण होणार आहे. जायका प्रकल्पाच्या विविध कामांचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पुणे शहरात येथे पन्नास वर्षाचा विचार करता आम्ही मेट्रो प्रकल्प, जायका प्रकल्प, आम्ही हे राबवले आहेत. असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक पुणेकराला आनंद वाटत असेल. आम्हाला याचा खूप आनंद वाटत आहे. असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: