Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे काँग्रेसच्या पर्यावरण विभाग अध्यक्षपदी रामदास मारणे

पुणे: भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत, पुण्यातील काँग्रेसचे रामदास निवृत्ती मारणे यांची पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते.

या प्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘‘तरूणाई हीच यापुढे पर्यावरणाचे रक्षण करणारी सक्षम पीढी राहील. त्या भावनेतून आम्ही रामदास मारणे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व जनजागृतीचे कार्य रामदास मारणे समाजातील सर्व स्तरात घेवून जातील अशा मला अपेक्षा आहे.’’ या प्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘स्व. इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी हे निस्सीम पर्यावरण प्रेमी होते. देशात पर्यावरण रक्षणाचा कायदा इंदिराजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्थापित केला.’’ यानंतर पर्यावरण विभाग प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात वृक्ष लागवड, पशुपक्षी संवर्धन, देवराई आणि जंगलाचे संरक्षण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.’’ या निमित्ताने नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास मारणे म्हणाले, ‘‘पुणे ही पर्यावरण रक्षणाची पंढरी आहे. पुणे शहरात नामवंत पर्यावरण शास्त्रज्ञ, तज्ञ, कार्यकर्ते यांचा समन्वय साधून पर्यावरण रक्षण व संवर्धनाबाबत दिर्घकालीन उपाययोजनेसंदर्भात कार्य करण्याचा मानस आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading