बार्टीच्या विद्यार्थ्यांचे उपोषण स्थगित उर्वरित 109 विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप
पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे च्या वतीने संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिप ही एकूण 400 विद्यार्थ्यांना देण्यात आली परंतु उर्वरित 109 विद्यार्थी हे फेलोशिप पासून वंचित राहणार असल्याने बार्टी कार्यालयासमोर 28 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते.

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक भाऊ बनसोडे ह्यांनी पुणे येथील बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या संशोधक विद्यार्थ्यांची भेट घेतली व उपोषणाला जाहीर पाठिंबा देत बार्टी चे संचालक धम्मज्योती गजभिये ह्यांच्या शी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
कालच सदरील विद्यार्थ्यांच्या मागणी प्रमाणे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF) साठी पात्र उर्वरित 109 विद्यार्थ्यांना देखील बी. ए. एन. आर. एफ. 2019-20 चा लाभ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता आजही सकाळी 10 वाजल्यापासून विवेकभाऊ बनसोडे ह्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना न्याय मिळावा ह्यासाठी सायंकाळी 4 पर्यंत पाठपुरावा केला शेवटी आज विद्यार्थ्यांनी 15 दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना पात्रता यादीत सामावून घेण्याबाबत संचालक धम्मज्योती गजभिये आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
दि.२८ फेब्रुवारी पासून विविध आंबेडकरी पक्ष संघटनेच्या नेते कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना भक्कम पाठिंबा दिला अनेकांनी ह्या प्रश्नी बार्टी प्रशासनाला धारेवर धरले उपोषणकर्त्यांनी सर्वांच्या प्रती आभार व्यक्त केले आहे.
