माहेर संस्थेतील मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना अन्न दान व फळ वाटप
पुणे : संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर ज्ञानेश्वर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आव्हाळवाडी माहेर संथा ( अनाथालय ) येथील मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना अन्न दान व फळ वाटप करण्यात आले. यावेळी मुलांसोबत केक कापून चंद्रशेखर घाडगे यांनी वाढदिवस साजरा केला. माहेर संस्थेचे सचिन आहेर व महेश वावरे यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच माहेर संस्थेस अन्नदान केल्या बद्दल त्यांचे आभार मानुन त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले, संभाजी ब्रिगेडच्या वतीने माहेर संस्थेस नेहमी भरीव मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व माहेर संस्थेतील मुले व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
