Friday, October 9, 2026
ENTERTAINMENTLatest News

कोण आहे ‘बँड बाजा वरात’चा सूत्रसंचालक?

झी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करून त्यांचं भरगोस मनोरंजन करते. यावेळी असाच एक अनोखा कार्यक्रम हि वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. लग्नसराई सुरु असताना, लग्नघरात झी मराठी वाहिनीचा आहेर आता पोहोचणार आहे. हो हे खरं आहे, झी मराठी ‘बँड बाजा वरात’ नावाचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे ज्यात नव दाम्पत्यांना झी मराठी कडून आहेर मिळणार आहे. या कार्यक्रमच स्वरूप अद्याप उलगडलं नसून झी मराठीच्या सोशल मीडियावर नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो रिलीज केला आहे. ‘लग्न वाजतंय घरात, मांडव सजला बाहेर ओळख पाहू कोण घेऊन येणार, झी मराठीचा आहेर?’ असं म्हणत प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोण आहे याचं कोडं वाहिनीने घातलं आहे. या कोड्याचं उत्तर देखील प्रेक्षकांनी कमेंट सेक्शनमध्ये दिलं आहे. बहुतांश प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे कि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हा पुष्कराज चिरपुटकर आहे. आता हे उत्तर बरोबर आहे कि चूक हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. पण या कोड्याने प्रेक्षकांची या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता मात्र नक्कीच वाढवली आहे. बँड बाजा वरात हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading