राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढविणार – काशिनाथ शेवते
पुणे: राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी पुण्यात केली.
राष्ट्रीय समाज पक्ष्याच्या पुणे शहर उपाध्यक्षा सुनीता किरवे व उपाध्यक्ष बालाजी पवार यांनी केलेल्या महिला मेळाव्यात आज ही माहिती देण्यात आली . सदर कर्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिलांनी उपस्थिती लावली .
यावेळी उपाध्यक्ष बालाजी पवार ,उपाध्यक्षा सुनीता किरवे ,विनायक रुपनवर ,अंकुश देवडकर यांनी सर्वसामान्य कुटुंबातुन आलेल्या प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते व मुख्य महासचिव महराष्ट्र राज्य माऊली सलगर यांचा पैशाची माळ घालून सत्कार केला .
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलेल्या आदेशावरून पुणे तथा संपूर्ण राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने पक्ष लढविणार आहे
उपाध्यक्ष बालाजी पवार यांनी यावेळी महिलांना प्रत्येकी 25 हजार रुपये चेकचं वाटप केलं
हे वाटप सुमारे 10 महिलांना करण्यात आलं
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष पुणे महानगरपालिका साठी प्रभाग 55 मधून बालाजी पवार तर प्रभाग 56 मधून सुनिता किरवे यांना पक्षाने उमेदवारी दिली अशी घोषणा देखील करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते ,महाराष्ट्र मुख्य सचिव माऊली सलगर,युवक अध्यक्ष अजित पाटील, विनायक रुपनवर, बालाजी पवार, अंकुश देवडकर, सुनीता किरवे उपस्थित
होते.
