शिवजयंती निमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने ने मुलांना बिस्कीट व फळ वाटप
पुणे:अखंड भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने आव्हाळवाडी व वढू बुद्रुक येथील माहेर संस्था ( अनाथालय ) मधील मुलांना बिस्कीट व फळ वाटप करून माहेर संस्थेतील मुलांसोबत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या माहेर संस्थेस संभाजी ब्रिगेड च्या वतीने नेहमी सहकार्य करण्यात येईल असा शब्द संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, जिल्हा सचिव निलेश ढगे, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष जयदीप रणदिवे, कौस्तुभ होळकर,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सोनु शेलार, वाहतुक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय कदम, भरत भुजबळ, उमेश म्हेत्रे, जिल्हा सरचिटणीस सनी थोपटे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी,संघटक हनुमंत गुरव, व्यापारी आघाडीचे आदम तांबोळी, संतोष सुर्यवंशी, केदारी नाना, व माहेर संस्थेचे व्यवस्थापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
