Friday, June 19, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महापालिकेच्या २० एप्रिल ते १० मे दरम्यान निवडणूका होतील – चंद्रकांत पाटील

पुणे : महापालिकेच्या २० एप्रिल ते १० मे दरम्यान निवडणूका होतील असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे ते आज भाजप कार्यकर्ता राजेंद्र भिंताडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले असता बोलत होते.
ते त्यांच्या भाषणात म्हणाले, महापालिकेच्या निवडणूका येऊ घातलेल्या आहेत मी तुमची मदत मागायला आलोय, २० एप्रिल ते १० मे दरम्यान महापालिका निवडणूका होतील. निवडणुकांना वेळ का तर ५ वर्षांत भाजपने काम केलंय की त्यामुळे काय करायचं हा प्रश्न विरोधकांना पडला आहे आणि म्हणून प्रभागाची मोडतोड सुरु असून त्यामुळे निवडणूकांना वेळ केला असा आरोपही पाटील यांनी केला.
तसंच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीच्या लोकांना उभं राहु द्यायचं नाही. काल दादांना जाब विचारला तर त्यांनी वेळ मारून नेली अशी टीकाही त्यांनी अजित पवारां वरती केली.
दरम्यान ते म्हणाले, आता भाजप कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशन मध्ये बोलावून धमकावलं जाते आहे. आमच्या पक्षात प्रवेश करा म्हणून दमदाटी होतेय मात्र मी इशारा देतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना की कालचक्र सुरु आहे. ‘आज तुम्ही वर आम्ही खाली आहोत; फार काळ राहीला नाही जेव्हा आम्ही वर जाऊ, केंद्रात सत्ता आहेच आमची.’ असही ते म्हणाले.
राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपचे सोळा नगरसेवक भाजपमध्ये येणार असल्याचं वक्तव्य केलं होत अशातच आता पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशन मध्ये बोलावून धमकावलं जाते आहे. आमच्या पक्षात प्रवेश करा म्हणून दमदाटी होत असल्याचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading