सौंदर्यवतींच्या शोधार्थ व्हीएलसीसी प्रस्तुत फेमिना मिस इंडिया २०२२ स्पर्धा सज्ज
पुणे : भारतातील प्रतिभावंतांना आपले तेज दाखवण्याची संधी घेऊन व्हीएलसीसी प्रस्तुत मिस इंडिया ऑर्गनायझेशन २०२२ सज्ज झाले आहे . सौंदर्यदूतांच्या शोधार्थ मिस इंडिया संघटना डिजिटल मीडियाच्या जगात शोधमोहिमेचा विस्तार करत आहे. तरुणाईच्या सक्षमीकरणाचा दृष्टीकोन आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतातील सर्वोत्तम प्रतिभा सादर करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.
सेफोरा, मोज आणि रजनीगंधा पर्ल्स ह्याच्या सहयोगातून ही सौंदर्यस्पर्धा व्हर्च्युअल माध्यमातून होणार आहे . या स्पर्धेसाठी २८ राज्यातून तसेच दिल्ली, जम्मू आणि काश्मीरातून प्रत्येक एक प्रतिनिधी निवडली जाणार आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेशांतूनही एका सामूहिक प्रतिनिधीची निवड केली जाणार आहे . अशा पद्धतीने अंतिम स्पर्धेसाठी एकूण प्रतिनिधींचा आकडा ३१ वर जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यनिहाय प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे.
ही स्पर्धा आयकॉन्स घडवण्याची आपली परंपरा पुढेही अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. नव्या युगातील स्त्रीशक्ती, जिच्यात नेतृत्वाची क्षमता आहे, आणि भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्याचेही सामर्थ्य आहे, तिला मनापासून पाठबळ देण्याचे आमचे ध्येय आहे. यंदा ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.सौंदर्य आणि वेलनेस उद्योगातील अग्रगण्य ब्रँड असलेल्या व्हीएलसीसीने भारताचा नवा गौरव शोधण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेसोबत हातमिळवणी केली आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवाराला मोज अँप डाऊनलोड करावे लागणार आहे . त्यावर आपले प्रोफाइल तयार करून तीन ऑडिशन व्हिडिओज (इंट्रोडक्शन, टॅलेंट आणि रॅम्पवॉक) अपलोड करावे लागतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट मिस इंडिया वर लॉगइन करून आवश्यक माहिती भरावी लागणार आहे.
नेहा धुपिया म्हणाली की दरवर्षी फेमिना मिस इंडियाच्या मार्गक्रमणात माझे मन पुन्हा भूतकाळात रमून जाते. यात मला मिळालेले अनुभव आणि शिकवण पुन्हा तीव्रपणे आठवते. हा ठेवा मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे. तरुण स्पर्धकांची यशस्वी होण्याची इच्छा पाहून भारवून गेल्यासारखे वाटते.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाची किमान उंची ५ फूट ३ इंच असली पाहिजे. स्पर्धकाचे वयही १८ ते २५ वर्षे या वयोगटातील असले पाहिजे. २६ व २७ वर्षीय स्पर्धकांना रनर्स अप पातळीपर्यंतसाठीच पात्रता असेल. ओसीआय कार्डधारक फक्त सेकंड रनर्स अपपर्यंतच पात्र असतील.या स्पर्धेसाठी १५ मार्च २०२२ पर्यंत नावनोंदणी सुरु असणार आहे .
