Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

शिवसेना भारतीय जनता पार्टीला सडेतोड उत्तर देईल -विशाल धनवडे

पुणे: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ईडी ,केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजप महविकास आघाडी सरकार मधल्या नेत्याना अडकवले त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले.
खासदार संजय राऊत म्हणाले,ईडीवाल्यांनो ऐका हिंमत असेल तर माझ्या घरी या.मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू.तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा. जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल. त्यावर पुण्यातील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या ऑफिस समोर शिवसैनिकांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. विशाल धनवडे म्हणाले, या भारतीय जनता पार्टीने घेऊन ईडी ,केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजप महविकास आघाडी सरकार मधल्या नेत्याना अडकवले . आज आमचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. आम्ही ईडी ,केंद्रीय यंत्रणांना घाबरत नाही. थोड्याच दिवसात शिवसेना भारतीय जनता पार्टी ला सडेतोड उत्तर देईल. असा इशारा विशाल धनवडे यांनी भाजपला दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading