Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सोमय्या आणि त्यांचा मुलाला PMC बँक घोटाळ्यात अटक करा – संजय राऊत यांची मागणी

  • मोहित कंबोज फडणवीस यांना अडचणीत आणणार असल्याचाही संजय राऊत यांचा दावा
  • ठाकरे सरकार पाडण्यासाठी केंद्राकडून कारस्थान

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. सरकार पाडण्यासाठी मदत करा, नाहीतर तुम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा ‘टाईट’ करतील, असे अनेकदा मला धमकावण्यात आले. मात्र मी नाही म्हटल्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीच्या धाडी सुरू झाल्या, असे सांगत ‘हीच का तुमची लोकशाही’, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच सोमय्या यांचा ‘मुलूंडचा दलाल’ असा उल्लेख करीत राऊत यांनी ‘किरीट सोमय्या यांचा मुलगा नील आणि पीएमसी घोटाळ्यातील आरोपी  राकेश वाधवान हा निकॉन इन्फास्ट्रकचरमध्ये भागीदार आहेत’, असे सांगत व त्यांचा प्रोजेक्ट विना परवाना असल्याची कागदपत्र सादर करीत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले ?

  • महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जाता आहे.
  • सरकार पाडण्यासाठी मदत करा नाहीतर तुम्हाला केंद्रीय तपास यंत्रणां ‘टाईट’ करू
  • नाही म्हटंल्यावर माझ्याशी संबधीत लोकांवर धाडी पडायला लागल्या
  • मला फ्रेम करण्यासाठी माझ्या आजूबाजूच्या लोकांना फ्रेम करण्यात आलं
  • सोमय्या यांना म्हटंले ‘मुलूडचा दलाल’
  • ठाकरेंचे 19 बंगले तुम्हाला दिसले तर मी राजकारण सोडेन
  • मराठी भाषेच्या विरोधात जो न्यायालयात जातो, तो पालिकेत मराठी कट्टा चालवतो. हा भाजपचा ‘फ्रंटमॅन’
  • पत्राचाळ मी पाहिलेली नाही, पीएमसी बँकेत माझ खात नाही.
  • देवस्थानाची जमीन आम्ही घेतल्याचे सिद्ध करा
  • 50 गुंठे जमीनीसाठी माझ्या गावातील लोकांचा तपास ईडी करतायेत
  • गुजरातमध्ये मोठा घोटाळा ती एफआयार दोन वर्ष घेतली नाही
  • माझी बँक खाती असलेल्या बँकेत ईडी गेली होती
  • कुठे जायची तिथे जा पण आता टक्कर शिवसेनेसोबत आहे
  • फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा सर्वात मोठा घोटाळा
  • फडणवीसांच्या काळात साडे तीन हजार कोटी दूधवाल्याच्या खात्यात
  • ईडी आणि सीआयबी पीएमसी घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान कडून भाजपला 20 कोटी पक्ष निधी
  • किरीट सोमायया यांचा मुलगा नील आणि राकेश वाधवान यांचा निकॉन इनफास्टरकचर मधला भागीदार आहे
  • मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांकडून ईडीच्या नावाने जितेंद्र चंद्रलाल नवलाणी यांच्यासह अनेक जण वसूली करत आहेत. त्यांनी जवळपास तीनशे करोंड उकळले आहेत.
  • महाराष्ट्र, बंगाल, झारखंड येथील सरकार पाडण्याचे मोठे हे कारस्तान आहे.
  • सध्या पवार कुटूंबयावर धाडी पडताएत
  • भाजपच्या काही नेत्यांनी मला त्रास देण्यासाठी माझ्या कुटूमबीयांना धारेवर धरलं
  • पत्राचाळची जमीन मोहीत कंभोज यांनी खरेदी केली आहे. त्यासाठी वापरलेला पैसा हा पीएमसी बँकेचा आहे.
  • मोहीत कंभोज हा फडणवीस यांचा माणूस असून तो फडणवीस यांना बुडवणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading