ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन
पुणे : दिग्गज उद्योगपती आणि बजाज समूहासे प्रमुख पद्मभूषण राहुल बजाज यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी मोठे योगदान आहे.
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.
राहुल बजाज यांचा विवाह 1961 साली रुपा घोलप या मराठी तरुणीसोबत झाला. या जोडप्यांना राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुलं आहेत. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. सन 2016 च्या फोर्ब्ज च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज हे 722 व्या क्रमांकावर होते. राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले.
