Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कडेकोट बंदोबस्तात पुणे पालिकेच्या पायरीवर किरीट सोमय्यां यांचा सत्कार

तुम्ही ज्या कोविड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचा,मालक कोण आहेत ? – किरीट सोमय्या 

पुणे : मागील आठवड्यात किरीट सोमय्या  यांच्यासोबत पुणे महानगरपालिका धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर शहरातील राजकारण चांगलच तापलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना अटकही केली होती. दरम्यान किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यावर रोखण्यात आलं होतं त्याच पायऱ्यावर आज कडेकोट बंदोबस्तात त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी  महानगरपालिकेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरुद्ध घोषणा दिल्या.

सत्काराच्या वेळी किरीट सोमय्या सोबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक प्रवीण चोरबले पुणे महानगरपालिकेतील भाजपचे नगसेवक व पुणे शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

त्यांनी महापालिका आयुक्त यांची  पुन्हा हेल्थ केअर लाईफलाईन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी साठी भेट घेतली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनीप्रसार माध्यामाशी संवाद साधला ते म्हणाले,पुणे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक याचे आभार मानतो व शाब्बासकी देतो. या उद्धव ठाकरेच्या गुंडांनी या महापालिकेच्या पायऱ्यांवर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. होता. त्या मुख्यमंत्री ठाकरेंना माझं चॅलेंज आहे. तुम्ही ज्या कोविड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचा ,मालक कोण आहे ? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्याने नाव सांगाव ?असा सवाल किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित केला.

किरीट सोमय्या म्हणाले, मी पुणेकरांना त्याचंनाव सांगतो आज, जी कोविड कंपनी जी कधी रजिस्टर झाली नाही त्याचा मालक एक चहावाला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळलं आहे. त्यांचे मित्र संजय राऊत त्यांची बेनामी कंपनी आहे. 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले. पुणे महानगरपालिकेने त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरेने मुंबई महानगरपालिकेचे चार कॉन्ट्रॅक्ट दिले. उद्धव ठाकरे व संजय राऊत त्यांच्या बेनामी कंपनीवर कारवाई झाल्या शिवाय किरीट सोमय्या गप्प बसणार नाही, असे मत सोमय्या यांनी व्यक्त केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading