किरीट सोमय्या यांच्या सत्कारानंतर कॉँग्रेसकडून पायऱ्यांचे शुद्धीकरण; ‘आप’ कडूनही निषेध
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली त्याच पायरीवरआज भाजपने त्यांचा सत्कार केला. यावेळी पालिका सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली. अन् केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना आता सोडण्यात आले होते. हे पुणेरी संस्कृतीला शोभणारे नाही. पालिका आज भाजपचा अड्डा झाली होती, असे म्हणत कॉँग्रेसकडून या पायऱ्यांवर गोमुत्र व गुलाब पाणी टाकून पायऱ्यांचे शुद्धीकरण करण करण्यात आले.
या विषयी बोलताना कॉँग्रेस कार्यकर्ते सचिन कारेकर म्हणाले, आज सोमय्यां यांच्या सत्कारासाठी मोठा पोलिस फौजफाटा होता. सामान्य नागरिकांसाठी पालिका बंद ठेवण्यात आली होती. पालिका केवळ भाजपचा अड्डा झाली होती. हे पुणेरी संस्कृतीला शोभणारे नाही. म्हणून आम्ही गांधीगिरी मार्गाने पायऱ्यांवर गोमुत्र व गुलाब पाणी टाकून पायऱ्यांचे शुद्धीकरण केले आहे.
‘आप’ने ही निषेध व्यक्त
सोमय्यां यांच्या सत्कारानंतर पुण्यातील आम आदमी पक्षाच्या कारकर्त्यांनीही या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. आपचे कार्यकर्ते म्हणाले, सत्कारासाठी सामान्य नागरिकांना पालिकेत प्रवेश नाकारण्यात आला. ही माणुसकीला धरून झालेली कृती नाही. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
