Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली त्या पायऱ्यांवर सोमय्यांचा सत्कार करणार – जगदीश मुळीक

पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी जो हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतो. शिवसैनिकांवर कडक कारवाई करावी यासाठी आज आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तसेच महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली त्या पायऱ्यांवर सोमय्यांचा सत्कार करणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज सांगितले.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे शिवसेनेच्या कार्यक्रत्याची आज अटक व जामीन झाली. तरी अजून काही वाद संपला असे वाटत नाही. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात आज भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयात आयुक्तांची भेट घेतली.
त्यांनतर त्यानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

जगदीश मुळीक म्हणाले, आमचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी जो हल्ला केला याचा आम्ही निषेध करत आहोत. येत्या अकरा तारखेला किरीट सोमय्यांना पुन्हा पुण्यात बोलावणार आहोत. आम्ही पण आता शांत बसणार नाही. शिवसैनिकांवर कडक कारवाई करावी यासाठी आज आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली त्या पायऱ्यांवर दुपारी चार वाजता सोमय्यांचा सत्कार करणार आहोत, असे बोलून जगदीश मुळीक यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading