Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

रुग्णांवर होणारी महिला कर्मचाऱ्यांची हुकुमशाही वागणूक थांबवावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन – चंद्रशेखर घाडगे

पुणे :वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र महिला कर्मरचाऱ्यांचा तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलांना विनाकारण त्रास देण्यात येत आहे, गर्भवती महिलांना आवाज चढवून बोलण्यात येत आहे, महापालिका आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देऊन मनमानी करणाऱ्या आणि तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलांना आवाज चढवून अर्वाच्या भाषेत बोलणाऱ्या वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला कर्मचार्यांवर त्वरित कारवाई करावी. त्यांच्या आशा वाईट वागणुकी मुळे गर्भवती महिलांना मानसिक त्रास होत आहे, तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या वागणुकीला वैतागून महिला वाघोली येथील सरकारी दवाखान्यात जायला टाळत आहेत, मग राज्य सरकारने आरोग्य खात्यावर लाखो रुपये खर्च करून फायदा काय आहे,असा प्रश्न आरोग्य मंत्र्यांना संभाजी ब्रिगेड चा आहे. सरकारी दवाखान्यातील कर्मरचाऱ्यांची रुग्णांना वागणूक जर वाईट मिळत असेल तर संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, आणि त्या कर्मचाऱ्याना संभाजी ब्रिगेडच्या स्टाईल ने उत्तर देण्यात येईल, गर्भवती महिलांची तपासणी करताना चीड चीड करणाऱ्या तसेच एकेरी भाषेत आणि आवाज चढवून बोलणाऱ्या वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करून महिला रुग्णांवर होणारी महिला कर्मचाऱ्यांची हुकिमशाही वागणूक थांबवावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading