वस्ताद साळवे स्मारक : भुसंपादन करण्यासाठी ८७ काेटी रुपयांचा निधी खर्च करण्यास राज्य सरकारची मान्यता
पुणे:संगमवाडी येथील नियोजित अाद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी भुसंपादन करण्यासाठी सुमारे ८७ काेटी रुपयांचा निधी खर्च करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलीअाहे. या निर्णयाचे महाविकास अाघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले अाहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, शांतिलाल मिसाळ, रवी पाटाेळे, राम कसबे, राजू अडागळे यांनी पत्रकार परीषदेत राज्य सरकारच्या निर्णयाची माहीती दिली . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अाभार मानले. मातंग समाजाकडून लहुजी वस्ताद यांच्या स्मारकाची मागणी केली जात हाेती. भाजप सरकारने केवळ अाश्वासनेच दिली. परंतु महािवकास अाघाडीच्या राज्य सरकारने मान्य केली, त्यानंतर समिती स्थापन केली. अाता भुसंपादनाला जागा ताब्यात घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला अाहे. या स्मारकाच्या उभारणीमुळे पुण्याच्या वैभवात भर पडणार अाहे. या स्मारकात लहुजी वस्ताद यांचा इतिहास सादर केला जाईल, तसेच इतर समाजाेपयाेगी उपक्रम राबविले जातील.या स्मारकासाठी राज्यभरातून सुचना मागविण्यात येतील, त्यातील चांगल्या सुचनांचा विचार केला जाणार असल्याचे डाकले यांनी नमूद केले.
