पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
पुणे: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये कोरोना तसेच ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
कोरोनाच्या पुन्हा वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यातील शाळा देखील बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. पुण्यातील शाळा अद्याप बंद ठेवण्याचा निर्णय महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला होता. टास्क फोर्सशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं.
आता महापोर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करत दिली आहे. कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल, असं ट्विट त्यांनी केले आहे.
