Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

प्रजासत्ताकदिनी ‘दगडूशेठ गणपती’ तर्फे लसीकरणाचा संदेश देणारी रंगावली

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने समृद्ध भारत, शक्तिशाली भारत, कोरोनामुक्त करुया असा संदेश देत लसीकरणाबाबत जनजागृती करणारी भव्य २० बाय १६ फूट आकारात रंगावली साकारण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगावली साकारण्यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृृतमहोत्सवानिमित्त ७५ किलो पेढे देखील नागरिकांना वाटण्यात आले.

कोतवाल चावडी येथे पुणे मनपा सफाई कर्मचारी व ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते ध्वजारोहण व झेंडावंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अतुल चव्हाण, विशाल केदारी, अमोल चव्हाण यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ध्वजवंदनाकरीता उपस्थित होते. मंदिरावर देखील तिरंगी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती.

सफाई कर्मचारी जे योगदान देतात, त्यामुळेच स्वच्छ भारताचे चित्र आपण पाहू शकतो. त्यामुळे त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करावे, असा संदेश देत काढण्यात आलेली रंगावली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading