Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

विलंब शुल्क न लावता आवेदनपत्र भरण्याची मुदत वाढ करण्याची रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी

प्रति विद्यार्थी 1600 रु अतिविलंब शुल्क व नियमित परीक्षा शुल्क असे किमान 2200 रु परीक्षा फिस प्रत्येकी लागणार आहे

औरंगाबाद : रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने परीक्षेच्या आवेदन पत्रास विलंब शुल्क न लावता आवेदनपत्र भरण्याची मुदत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. दि . २४/०२/२०२२ रोजीच्या पत्रानुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे आवेदन पत्र भरण्याची मुदत वाढ करण्यात आली आहे परंतु विलंब शुल्क तसेच ठेवल्याने विद्यार्थी हवालदिल झाले असल्याने आज निवेदन देण्यात आले.

सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झल्याने ओला दुष्काळ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे . शिवाय ओमायक्रॉनाचा प्रादूर्भाव असल्याने विविध वस्तीगृह देखील खाली करण्यात आले आहे . त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे , कोविडमुळे नागरीक हवालदिल झालेले असतांना विद्यापीठाने लागू केलेले विलंब शुल्क भरणे विद्यार्थ्यांना शक्य नसल्याकडे कुलगुरूंचे लक्ष वेधण्यात आले.

मागील २ वर्षापासून अनेकांचे रोजगार बुडाले आहेत . अनेक कुटूंबावर कुटूंबातील सदस्य दगावल्यापे दुःखाचा डोगंर कोसळलेला आहे . त्यामुळे लागू केलेले विलंब शूल्क अन्यायकारक असल्याची जाणीव करून देण्यात आली. तसेच विद्यापीठ प्रशासन सर्वच परीक्षा ऑनलाईन घेत असल्याने अशा प्रकारची शुल्क वसुली करणे हे अवाजवी असल्याचा आरोप करण्यात आला .

मागील २ वर्षापासून पेपर सेटींग करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठाने अदा केले नाही, असे असतांना कुठल्याही पेपर सेटरचे मानधन अदा न करता , परीक्षेच्या कामासाठी येणारा कुठलाही खर्च न करता ( प्रश्नपत्रिका , उत्तपत्रिका छापनी , उत्तपत्रिका वाहतूकीसाठी लागणारा खर्च , पर्यवेक्षकांना मानधन अदा न करता , व इतर सर्व प्रकारचा खर्च ) अशा प्रकारे विलंब शुल्क लावून केवळ परीक्षेतून पैसा उभा करणे जर विद्यापीठाचा हेतू असेल तर हा प्रकार धक्कादायक आहे ह्यावर संघटनेने आक्षेप घेतला आहे.

मागील परीक्षा विभागाचे संचालक पाटील यांनी तत्कालीन परीस्थितीनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा वाढीव भुर्दंड बसू नये याची काळजी घेतली होती . परंतु विद्यार्थी व विद्यार्थी संघटनेने मागणी करून देखील विद्यापीठ प्रशासन विलंब शुल्क घेण्यावर ठाम असेल तर या विरोधात लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा देण्यात आला.

कुलगुरूंनी हे विलंब शुल्क निकालात तांत्रिक अडचणी अभावी त्रुटी असणाऱ्यांसाठी नसून विलंब शुल्कातून त्याना सूट देण्यात येईल असे सांगितले परंतु परिपत्रकात असा उल्लेख का केला नाही असा प्रतिप्रश्न करत सरसकट सर्व विद्यार्थ्यांना विलंब शुल्क माफी करावी अशी आग्रही मागणी केली.

तात्काळ कुठल्याही प्रकारचे विलंब शुल्क न आकारता १० दिवसाची मुदत वाढ आवेदन पत्र भरण्यासाठी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. ह्यावेळी सचिन निकम,ऍड.अतुल कांबळे, पँथर्स चे गुणरत्न सोनवणे,ऍड.बुद्धपाल,विकास रोडे,मनोज शेळके आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading