Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

एअरॲटिक्स स्टोअरेज ने केली स्टोअरेज उपायांसाठी ओयो बरोबर भागीदारी

पुणे : एअरॲटिक्स या स्टोअरेज आणि पार्किंगची जागा उपलब्ध करून देणार्‍या अनोख्या मार्केटप्लेस ने नुकताच स्वतंत्र अशा ओयो हॉटेल्स ॲन्ड होम्स या हॉटेल्स / लॉजेस उपलब्ध करून देणार्‍या कंपनी बरोबर सहकार्य करून पार्किंग आणि स्टोअरेज स्पेसेस उपलब्ध करून देण्यासाठी भागीदारी केली आहे.  ओयो हॉटेल्स ॲन्ड होम्स ही कंपनी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून या आदरातिथ्य चेन कडून हॉटेल्स, घरे आणि राहण्याच्या जागा उपलब्ध करून दिल्या जातात. या जागांपैकी रिकाम्या खोल्या, आऊटहाऊसेस, बसेमेंट्स, हॉल्स, अन्य सुरक्षित अशा जागा आणि पार्किंग स्पेसेस आता ग्राहकांसाठी त्यांचे सामान ठेवण्यासाठी तसेच वाहने पार्क करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत,  आता या जागा एअरॲटिक्स पोर्टल वरून बुक करणे शक्य होणार आहे.

अनोख्या अशा या तंत्रज्ञानावर आधारीत मार्केटप्लेस च्या माध्यमातून एअरॲटिक्स ने साठवणूकीच्या जागेची तसेच पार्किंगच्या जागेच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला असून त्याच बरोबर अर्थार्जन ही करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे.  एअरॲटिक्स ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार विविध स्टोअरेज तसेच पार्किंगचे पर्याय उपलब्ध करून देतात.

एअरॲटिक्स स्टोअरेज चे संस्थापक आणि सीईओ आदित्य काळे यांनी सांगितले “एक मालमत्ता कमी असलेली आणि विश्वसनीय अशी मार्केटप्लेस असल्यामुळे एअरॲटिक्स कधीच स्टोअरेज आणि पार्किंग सुविधा भाड्याने देत किंवा घेत नाही पण त्याच बरोबर पर्किंग सुविधा तसेच स्टोअरेज सुविधांच्या मालकांना जागांची सूची करून त्यांच्या जागा एअरॲटिक्सच्या पोर्टल वरून भाड्याने देण्याची आणि घेण्याची संधी उपलब्ध करून देते.  एअरॲटिक्स मुळे मालमत्तांच्या मालकांना त्यांच्या वापरात नसलेल्या जागेला भाड्याने देऊन पैसे मिळवण्याची संधी उपलब्ध होते.”

या महामारीचा सर्वाधिक फटका हा आदरातिथ्य बाजारपेठेला बसलेला दिसून येतो, परिणामी हॉटेल चे बीॲन्डबी मालक हे त्यांच्या मालमत्ता भाड्याने देऊन उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत निर्माण करण्यावर भर देत आहेत.  एअरॲटिक्स कडून आता या क्षमतांच्या मालकांना त्यांची वापरात नसलेली साठवणूकीची आणि पार्किंगची जागा ही भाड्याने देण्याची संधी उपलब्ध करून  दिली जात आहे.

महामारी नंतर सार्वजनिक स्टोअरेजेस सुविधांची गरज ही वाढली, कारण विविध क्षेत्रातील ग्राहकांना या सुविधांची आवश्यकता होती, जसे घरून काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक, व्यापारी, घर दुरुस्ती करू इच्छिणारे लोक इत्यादी.

जागा ही कधीच इतकी महाग नव्हती पण आपण अशा युगात वावरत आहोत ‍जिथे लोकांच्या वस्तूंची संख्या ही जागेपेक्षा अधिक आहे.  ही संधी लक्षात घेऊन आदित्य काळे यांनी व्यक्ती आणि स्वतंत्र सार्वजनिक सुविधा देणार्‍या मालकांसाठी एक बुकिंग मंच निर्माण करावा ज्या माध्यमातून ते त्यांची मालमत्ता या पोर्टलवर मोफत लिस्ट करू शकतील आणि ते प्रमाणित ग्राहकांना त्यांच्या भौगो‍लिक तसेच बजेटच्या गरजांनुसार भाड्याने देऊ शकतील.

ओयोव्यतिरिक्त  व्यावसायिक मालमत्तांच्या मालकांनी तसेच सार्वजनिक सुविधांच्या मालकांनी जसे युवर स्पेस डॉक्टर (मुंबई), स्टोअरमोअर (नॉयडा), सेफ स्टोअरेज (बंगळूरू), दोराबजी ॲन्ड सन्स (पुणे), अभिरूची मॉल (पुणे) यांनी सुध्दा त्यांच्या मालमत्ता  कंपनीच्या पोर्टलवर  लीस्ट केल्या असून त्यांच्याकडून त्यांच्या ग्राहकांना या जागा भाड्याने देण्यात येत आहेत.   एअरॲटिक्स ने या शेअरिंग अर्थव्यवस्थेत बदल घडवण्याचे ठरवले असून त्या अंतर्गत स्टोअरेज आणि कनेक्ट सुविधा ही मालक आणि ग्राहक यांना देऊ केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading