Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

डॉ. कुणाल कामठे यांना युवा भूषण पुरस्कार प्रदान

पुणे : वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. कुणाल कामठे यांचा ह. भ. प. कै. पुंडलिक टिळेकर सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोंढवा महोत्सवात युवा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ह. भ. प. कै. पुंडलिक टिळेकर सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कोंढवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, गणेश घोष, नगरसेविका वृषाली  कामठे ,नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेवक वीरसेन जगताप , नगरसेवक अजय खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मूळव्याध मुक्त भारत हा उद्देश ठेवून डॉ. कामठे पाइल्स क्लिनिकतर्फे सलग ११ तास ५ मिनिटे आयुर्वेदिक पद्धतीने केलेल्या क्षारकर्म, क्षारसूत्र या उपचार शिबिराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच आयुर्वेद जनमानसात रुजविण्यासाठी याचा सामाजिक हितासाठी  कुणाल कामठे अग्रेसर राहिले आहेत.
डॉ. कुणाल कामठे म्हणाले, ‘मूळव्याध, फिशर, भगंदर हे आजार अनेकदा दुर्लक्षित केले जातात. या आजाराविषयी अनेक गैरसमज असतात. त्यामुळे उपचार करून घेण्यास रुग्ण लाजतात. या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर व्हावे तसेच उपचाराविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.
योगेश टिळेकर म्हणाले, कोंढवा बुद्रुक गावाने अनेक उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते निर्माण केले आहेत. वैद्यकीय क्षेत्र असेल ,वकिली क्षेत्र असेल अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये कोंढवा बुद्रुक गावातील व्यक्तिमत्व आपल्या कार्याचा सर्वत्र ठसा उमटवत आहेत. या सहकाऱ्यांचा  सन्मान व्हावा आणि गावातील तरुण वर्ग यांचा आदर्श घेऊन घ्यावा या  उद्देशाने ह.भ.प. कै.पुंडलिक टिळेकर यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम सुरू केला आहे.
विधीज्ञ सचिन कामठे, वस्ताद बाबासाहेब धांडेकर ,क्रिकेटपटू सचिन थोपटे, ह. भ .प .बंडू कामठे ,विश्वासची समगिर, उद्योजक चंद्रकांत गायकवाड अशा अनेक मान्यवरांचा व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading