ज्येष्ठ कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांचे निधन
नवी दिल्ली : ज्येष्ठ कथ्थक नर्तक, पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे निधन झाले., वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित बिरजू महाराज यांच्या निधनाची बातमी त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचं खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.
बिरजू महाराज यांची कारकीर्द
– देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांचे नृत्यदिग्दर्शन
– सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटातही यांचे संगीत
– 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित
– त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला
– बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल
– 2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित
– 2016 मध्ये, बाजीराव मस्तानीच्या मोहे रंग दो लालने त्यांच्या नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार
