Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त डेक्कन जिमखाना चौकामध्ये त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण परिसर संभाजी महाराजांच्या व सर्व परिवर्तनवादी महापुरुषांच्या घोषणांनी दणाणून सोडण्यात आला. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील, पुणे शहराचे महासचिव जितेंद्र जाधव,महेश कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम ज्ञानेश्वर चव्हाण, पुणे शहर संघटक आप्पा शिरसागर, सदस्य दीपक ओव्हाळ,वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष विवेक लोंढे, पर्वती विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष सुनील कांबळे, प्रेम कसबे, सनी अवघडे व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading