fbpx

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष कोण? याचा निर्णय आम्ही एकत्र बसून घेऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष कोण होणार हे अजून ठरायचे आहे. त्यावर आज निर्णय होणार आहे त्यावर पुणे जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ठरवण्यासाठी आम्ही बैठक झाली. सगळ्यांची मते जाणून घेतली.आता मी,वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. असे
उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकाराना माहिती दिली.

काल एका बिल्डरला अजित पवार यांच्या नावावर खंडणी मागितली.त्यावर अजित पवार म्हणाले,
माझ्या नावाने ज्या बांधकाम व्यावसायिकाला फोन करण्यात आला ते अतुल गोयल मला ओळखतात.  त्यांना ठाऊक आहे की, माझा फोन गेला की पलीकडच्या व्यक्तीला प्रायव्हेट नंबर आल्याचे दिसते.  त्यामुळे त्यांनी मला फोन केला.  मी वळसे पाटील यांना सांगितले आणि सायबर पोलीसांना याची माहीती देण्याचे ठरले.आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्रात जर ऑक्सीजन बेडची मागणी वाढत गेली आणि ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रिक टन पर्यंत गेली तर मुख्यमंत्री राज्यातील निर्बंधांबाबत कठोर निर्णय घेतील.असेही अजित पवार म्हणाले.

आसाममधे अडकलेल्या मुलांशी काल संपर्क झाला आहे.जे करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना प्रवास करायला बंधने आहेत. त्यावर पवार म्हणाले,आसाममधील मुलांना परत आनण्याची जबाबदारी असिम गुप्तांवर सोपविण्यात आली आहे. मुंब्रा बँकेसाठी शिवसानेचा उपाध्यक्ष का निवडून आला नाही याबाबत मी माहिती घेईन.

Leave a Reply

%d bloggers like this: