लोक भाजपला कंटाळले आहेत – सुशीलकुमार शिंदे

पुणे: देशात भाजपची हुकुमशाही चालली आहे. त्याला लोक कंटाळलेआहेत त्यामुळे लोक संधी शोधतायेत ती संधी उत्तरप्रदेश निवडणूकीच्या निमित्ताने मिळाली म्हणून मंत्री, आमदार धडाधड बाहेर पडत आहेत.अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज भाजपवर केली.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रजरांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावरना लढण्याचा नारा दिला आहे.त्यावर पक्ष जो निर्णय घेईल त्याचे आम्ही पालन करतो असेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, पंजाब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही लोकांनी गाड्या अडवल्या होत्या त्यावर शिंदे म्हणाले,च्या सगळ्या एजन्सी असतात कुठे काय रिस्क आहे कळवलं असेल. मात्र राजकारणाचा भाग आहे म्हणून पंतप्रधान तसे बोलले असतील.

Leave a Reply

%d bloggers like this: