पानिपत युद्ध हे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक – पोपटराव पवार

पुणे: पानिपताच्या युद्धात मराठे आपल्या प्राणांची बाजी लावून लढले. त्यांच्यामुळे परकीय आक्रमण भारतात येऊ शकले नाही. पानिपताचे युद्ध म्हणजे आपला पराभव नाही तर आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
मराठा शौर्य दिनानिमित्त श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने लाल महाल येथे पद्मश्री पोपटराव पवार आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत अनुप्रिया पवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 1761 साली राष्ट्र रक्षणासाठी मराठे व अब्दाली यांच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. यावेळी कामी आलेल्या महाराजा यशवंतराव पवार व ज्ञात-अज्ञात वीरांना या कार्यक्रमातून अभिवादन करून त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, शिरीष मोहिते, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार,उपाध्यक्ष रितेश पवार , मनोहर पवार, शेखर पवार, श्रीकांत पवार, उमेश वैद्य- पवार,, ऍड. राहुल पवार, निलेश पवार, सतीश उर्फ बाबा पवार, विठ्ठल पवार, आशुतोष पवार , अनिल पवार, राजेश पवार,सुनिल पवार, डॉ. राजाराम पवार, राजेंद्र पवार, राजेंद्र पवार, सतीश पवार, विकास पवार ,पंकज पवार,गजानन पवार तुषार पवार,रामनाथ पवार ,प्रवीण पवार,भीमराव पवार ,विजय पवार, लव पवार,कोकिळताई पवार,स्मिता पवार,विजया पवार,मनिषा पवार , डॉ.रंजना पवार, माई पवार,यामिनी पवार उपस्थित होते.

पवार घराण्याचा ऐतिहासिक निशाण ध्वज व शस्त्र पूजन करून मराठा वीरांना यावेळी मानवंदना देण्यात आली. पद्मश्री पोपटराव पवार ( हिवरे बाजार) व अनुप्रिया पवार (नाशिक )या मान्यवरांची अष्टधान्य तुला देखील यावेळी करण्यात आली.

पोपटराव पवार म्हणाले, तापमान बदलामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान हे मोठे आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे शोषण करून खूप मिळवले आहे, खरा आनंद तेव्हा मिळेल जेव्हा आपण निसर्गाची घेतलेली साधनसंपत्ती निसर्गाला परत देऊ.

सागर पवार म्हणाले, अहमद शहा अब्दालीसारख्या परकीयाचं आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: