जेव्हा माझा नवरा मला म्हणेल ‘मी हरलो तू जिंकली’ तो दिवस माझ्यासाठी न्यायाचा असेल- करुणा धनंजय मुंडे

पुणे : गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व व त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकून आज रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेमध्ये जाहीर प्रवेश  केला. यावेळी “जेव्हा माझा नवरा मला मी हरलो तू जिंकली असे म्हणेन तो दिवस माझ्यासाठी न्यायाचा असेल’, असे वक्तव्य करुणा धनंजय मुंडे यांनी केले.

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे नेते उपस्थित होते. यावेळी करुणा मुंडे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडेंनी जि मला वागणूक दिली ती एकदम चुकीची आहे. मला कार्यकर्त्यांना पुढे न्यायचं आहे. परळी मधून नवरा विरुद्ध बायको ही लढत होणारच, असा इशाराही करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला. नवऱ्याला भाजपात केल्याचं आवडत नसल्यामुळे भाजप सोडले. मला कार्यकर्त्यांना पुढे न्यायचं आहे. न्याय मी नक्की मिळवणारच असेही करुणा मुंडे म्हणाल्या. माझ्या मुलाला जर राजकारणात यावं वाटलं तर त्याला ही मी सांगेल की पाहिलं कार्यकर्ता हो. धनंजय मुंडे बरोबर आपलं भांडण वेगळं आहे, ‘अभी पिक्चर बाकी है’, असा इशाराही करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिला.

शक्ती कायदा तेव्हाच मानणार जेव्हा संजय राठोड विरोधात गुन्हा दाखल होईल 
राष्ट्रवादीच्या महिला  आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर त्या रोज उठून काहीतरी नवीन ट्वीट करत असतात. त्यावर मुंडे म्हणाल्या, रुपाली चाकणकर जे ट्विट करतात. ते स्टंटबाजी आहे  त्यांनी संजय राठोड यांच्या विरोधात FIR करुन दाखवावी. एखाद्याला अभिनेत्याला नोटीस पाठवणे हे स्टंट आहे.  असे म्हणत रुपाली चाकणकर यांना टोला हाणाला. तसेच शक्ती कायद्यावर पण त्यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या उद्धव ठाकरे जेव्हा संजय राठोडच्या विरोधात गुन्हा दाखल करतील तेव्हाच शक्ती कायदा मानणार.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: