fbpx

… तर मी परळी विधानसभा मतदार संघातूनही निवडणुक लढवेल – करुणा धनंजय मुंडे

पुणे : राज्यात माझा पक्ष आणि मी येणार्‍या प्रत्येक निवडणुका लढणार आहोत.  मी निवडणूक लढण्याबाबत अद्याप पर्यंत विचार केलेला नाही. पण माझ्या टीमची इच्छा असेल तर मी परळी विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढण्यास तयार आहे, असे विधान करूणा धनंजय मुंडे यांनी आज पुण्यात केले आहे.

करुणा धनंजय मुंडे या आज रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्यांवर संवाद साधला.

करूणा मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्रात एक इतिहास रचला जात आहे. मी महाराष्ट्रामधील पहिली महिला ठरली आहे की, मंत्री पतीच्या विरोधात एक मोहीम आणि आंदोलन चालवित आहे. त्याच्या चुकीच्या गोष्टी विरोधात आवाज उठविला आहे. तसेच एका मंत्री पतीने दोन मुलांच्या आईला 16 दिवसासाठी जेल मध्ये टाकले आहे. तसेच मी पहिली महिला आहे की, जीने राजकीय पक्ष स्थापन केला आहे. अन्याय आणि घराणेशाही सारखी घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्या विरोधात मोर्चा काढणारी पहिली महिला मी आहे. त्याचबरोबर महिलांना एकच सांगू इच्छिते की, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. मला काही मंत्र्याच्या पत्नीचा देखील फोन आलेत, ताई आपण जे काही करीत आहात. त्याच्यासाठी सॅल्युट आहे. आमच्यात तरी एवढी हिमत नाही. पण आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो. दरम्यान, या मोहिमेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करुणा मुंडे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: