यंदाचा ’68 वा सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सव’ रद्द
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा यंदाचा ’68 वा सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सव’ रद्द करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तर्फे लागू करण्यात आलेल्या निरबंधांमुळे हा महोत्सव रद्द करण्यात आला असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवीले आहे. दरम्यान, 6 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात येणार होता.
यंदाचे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव हा भव्य व मोठा करण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतु सध्याच्या कोरोना परिस्थितीत हा महोत्सव रद्द करण्याशिवाय दूसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानंतर राज्य सरकारकडून सवाई गंधर्व भीमसेन मोहत्सवाला परवानगी देण्यात आली होती.