‘वसंतोत्सव विमर्श’ उपक्रमात ‘टप्पा अवलोकन’

पुणे : ‘वसंतोत्सव विमर्श’ या उपक्रमात दर वर्षी संगीतविषयक सप्रयोग व्याख्यान कार्यशाळा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी बुधवार १९ जानेवारी, २०२२ रोजी सायं ६ ते ९ या वेळेत  हिराबाग येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह या ठिकाणी ‘टप्पा अवलोकन’ हा विशेष कार्यक्रम ‘विमर्श’ अंतर्गत होणार आहे. यासाठी कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत कलाकार व रसिक प्रेक्षकांना विनामूल्य आणि प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.

प्रथम सत्रात ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी कल्पना झोकरकर या टप्पा, टपख्याल, इ. प्रकारातील वैशिष्ट्यपूर्ण रचनांचे गायन करतील. त्यांना भरत कामत (तबला) व डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनिअम) हे साथ करतील. दुसऱ्या सत्रात टप्पा गीतविधा, त्याचे उपप्रकार, गायकी आदी विषयावर डॉ. चैतन्य कुंटे सप्रयोग विवरण करतील.

Leave a Reply

%d bloggers like this: