गंजपेठेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पीएमसी कॉलनी नं. ६ इमारतीच्या डागडुजीसाठी ४३ लाख मंजूर

पुणे: गंजपेठेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पीएमसी कॉलनी नं. ६ इमारतीच्या दुरस्ती व डागडुजीच्या कामासाठी भवानी पेठ सहाय्यक आयुक्त कार्यालया अंतर्गत ४३ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्याच कामाचे आज गुरूवारी भूमीपूजन करून येथील रहिवासी नागरिकांची संक्रांत गोड करण्याचे काम शिवसेनेचे शहर समन्वयक सागर पेटाडे यांच्या वारंवार करण्यात आलेल्या पाठ पुरवठ्यातून झाले. भूमीपूजनाच्या सोहळ्या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, विभाग प्रमुख राहूल जेकटे, शाखा प्रमुख राकेश बोराटे, निलेश जगताप, मनोज यादव, वसाहतीचे अध्यक्ष अर्जुन पेटाडे, कॉलनीतील रहिवासी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गंजपेठेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पीएमसी कॉलनी नं. ६ इमारतीची सांडपाण्याचे पाईप लिकेज, इमारतीच्या पार्कींगमध्ये साठलेले पाणी, तुटक्या-फुटक्या फरशा, परिसर आणि पार्कींगमध्येच साठलेला कचरा, भिंतींना तडे, स्लॅब पाझरलेले, भिंतींना ओल आलेली, अशी दयनीय अवस्था झाली आहे. स्वच्छचा नारा मिरवणार्‍या महापालिका प्रशासनाच्याच गंज पेठेतील इमारतीची अवस्था मरणासन्न झाली आहे. १२ मजली असलेल्या या इमारतीचे ड्रेनेज पाईप पार्कींगमध्ये ठिकठिकाणी लिकेज होत असून, सांडपाण्याच्या या इमारतीला धाराच लागलेल्या आहे. या इमारतीच्या झालेल्या दुरावस्थेमुळे येथील रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी आता या दुरस्ती व डागडुजीच्या कामातून ही परिस्थिती सुधारेल अशा भवना रहिवासी नागरिकांनी व्यक्त केल्या.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर ६ नं. कॉलनी महात्मा फुले पेठ याठिकाणी बी.ओ.टी. पध्दतीने बांधण्यात आलेल्या सदनिकेचे प्रकाश जावडेकर मंत्री यांच्या उपस्थितीत उदघाटन दिनांक ८ एप्रिल २०१६ रोजी झाले. मात्र, अवघ्या ६ ते ७ वर्षात या इमारतीची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. यावरून या इमारतीचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे आहे ते दिसून येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: