पुण्याचे जिजाऊनगर नावात नामांतर करा -विकास पासलकर
पुणे: छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या उद्यानात संभाजी महाराजांचे स्मारकाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच ज्या पुणे शहराला राजमाता जिजाऊंनी वसवले त्या पुणे शहराचे नाव जिजाऊनगर अथवा जिजापुर असे करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे केंद्रिय निरीक्षक विकास पासलकर यांनी केली.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाल महाल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक साहेब, मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव मारुतीराव सातपुते, सहआयुक्त संदिप कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज फांऊडेशनचे कैलास वडघुले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, विराज तावरे, स्मिता वडघुले, मंदार बहिरट यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बुध्दी प्रामान्यवादी जिजाऊ या डॉ.लिना निकम आणि शैलजा मोळक लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार नगरसेविका राणिताई भोसले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार समता परिषदेच्या मंजिरीताई घाडगे, महाराणी ताराराणी पुरस्कार वारसा फाउंडेशनच्या प्राचिताई दुधाने यांना प्रदान करण्यात आला. याचबरोबर आदर्श माता सन्मान महापौर मुरलीधरआण्णा मोहोळ यांच्या मातोश्री रुक्मिणी किसनराव मोहोळ, तसेच सुजाता संभाजी झोळे, उषा रामेश्वर पाटील, उषा तात्याबा मोहोळ, सारिका मयूर शिरोळे, शशिकला साहेबराव लहाने, सुशीला वामन गायकवाड, कमल रामचंद्र साळुंखे, विमल भिकाजी पासलकर, नंदा राजाराम काशीद, उषा रमेश कचरे, भारती विजय कांदे यांचा तर विविध क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमटविणार्या अर्चना मोरे, छायाताई खैरनार, नीलिमा पवार या महिलांचा ही गौरव करण्यात आला.
पासलकर पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊंच्या विचाराने आगामी काळात काम होणे गरजेचे आहे. ज्या वास्तूमध्ये स्वराज्य निर्माणकरता शिवाजी महाराजांना घडविले त्या लाल महालाची स्वच्छता नसावी ही मोठी शोकांतिका आहे. याबाबत प्रशासनाने विचार करावा. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख म्हणाले की शिवराय समजून घेण्यासाठी जिजाऊ समजून घेणे गरजेचे आहे. पुरस्कार मिळालेल्या पुरस्कारार्थींचे समाजाप्रती दायित्व वाढले असून ते सार्थकी लावावे. याप्रसंगी राणिताई भोसले, मंजिरीताई घाडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वडघुले, विराज तावरे आणि प्रशांत धुमाळ यांनी तर दत्ताभाऊ पासलकर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश गुंड सचिन जोशी सुरेश खोपडे आदींनी परिश्रम घेतले
