पंजाब सरकारच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाचे आंदोलन
पुणे : दोन आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
पंजाब दौऱ्यावर असताना काही आंदोलकांनी त्यांच्या गाड्या व त्यांना अडविले . पंजाब सरकारने नरेंद्र मोदी यांना सुरक्षा दिली नाही म्हणून भाजप दोन आठवड्यापासून याचा निषेध करत आहे. आज परत पुण्यात भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने याचा निषेध करण्यात आला.
हे निषेध आंदोलन झाशी राणी पुतळा, बाल गंधर्व चौक, येथे करण्यात आले. हे निषेध आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाब सरकारने सुरक्षा दिली नाही म्हणून पंजाब सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी केले.
या आंदोलनाला यशोधन आखाडे, नंदकुमार गोसावी, ओंकार माळवदकर, अमोल पांडे उपस्थित होते.
योगेश पिंगळे म्हणाले,पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी पंजाबमध्ये जे काही घडलं ते अत्यंत गंभीर होतं. या घटनेचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे. या घटनेची राष्ट्रपतींनी गंभीर दखल घेतली पाहिजे. देशात वेगवेगळया पक्षांची, आघाड्यांची सरकारे आली होती. राज्यात आणि केंद्रात अनेकदा वेगवेगळया पक्षांची सरकारे देशाने पाहिली आहेत. मात्र पक्षीय द्वेषापोटी देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षा व्यवस्थेशी घातक खेळ आजवर कोणीच केला नव्हता. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची योजना केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणा परस्परांशी समन्वय ठेवून आखत असतात. पंजाब सरकारने त्यांच्या सुरक्षेचे नियोजन करायला पाहिजे होते.ते केले नाही याचा निषेध आज आम्ही आंदोलनातून करत आहोत. असे योगेश टिळेकर म्हणाले.
