Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सुवर्णपदक विजेते पाॅवरलिफ्टर शाम साहनी यांचा सत्कार

पुणे लष्कर: इस्तंबूल येथे पार पडलेल्या ऐशियन क्लासिक पाॅवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत मास्टर थ्री गटात भारताला ८ सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पाॅवरलिफ्टर शाम साहनी यांचा कर्तव्य फाउंडेशन व लष्कर पोलीस ठाणे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याहस्ते त्यांना तिरंगी मफलर, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.यावेळेस सौ.प्रीती साहनी , अरविंद बुधाणी,फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे ,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, उपाध्यक्ष सचिन कांबळे,सुनील बाथम, दीपक कदम आदी उपस्थित होते.
वयाच्या ६३ व्या वर्षी ८ सुवर्णपदक मिळवून भारताचा नावलौकिक वाढवल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, विकास भांबुरे व अरविंद बुधाणी यांनी शाम साहनी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
सोबत- सत्काराचा फोटो

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading