पुणे शहरात आज दिवसभरात 3 हजार 459 नवीन कोरोना रुग्ण
पुणे : पुणे शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख वर चालला होता. मात्र दोन दिवसांपासून ही रुग्ण संख्या काहीशी स्थिर झाल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 3 हजार 459नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1104रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काल (दि.10) दिवसभरात 3 हजार 67 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 32 हजार 561 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 30 हजार 79 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 2 पुणे महापालिका हद्दीबाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 19452 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 146 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 14983 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार, दि. ११ जानेवारी २०२२
◆ उपचार सुरु : १९,४५२
◆ नवे रुग्ण : ३,४५९ (५,३२,५६१)
◆ डिस्चार्ज : १,१०४ (५,०३,९७९)
◆ चाचण्या : १४,९८३ (४०,०७,५०३)
◆ मृत्यू : १ (९,१३०)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/OtXcLNM3Vt— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 11, 2022
