fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी

पुणे : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने नुकतेच नवीन निर्बंध जारी केले आहेत. आता पुणे जिल्हा प्रशासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घातली आहे.

 बंदी घातलेली पर्यटनस्थळे-

मावळ तालुका – भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर इत्यादी.

मुळशी तालुका – लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर.

हवेली तालुका – घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर

आंबेगाव तालुका – डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ.

जुन्नर तालुका – शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र.

भोर तालुका – रोहडेश्वर / विचित्र गड़, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड.

वेल्हा तालुका – तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading