सावा हेल्थकेअरकडून हर्बल फॉर्म्युलेशन्स बिझनेस लॉंच
पुणे : सावा हेल्थकेअर या भारतीय मल्टीनॅशनल कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून तिची प्रबळ जागतिक उपस्थिती आहे. मानवी व पशुवैद्यकीय फार्मास्युटिकल्सचे उत्पादन करणा-या या कंपनीने आज आयुर्वेदाच्या शास्त्रावर आधारित असलेल्या सावा हर्बल्स नावांतर्गत हर्बल फॉर्म्युलेशन्सच्या ओटीसी (ओव्हर दि काऊंटर) व्यवसायाच्या लॉंचची घोषणा केली. सावाचा अद्वितीय उत्पादनांमध्ये दशकाहून अधिक काळाचा अनुभव आहे आणि जागतिक स्तरावर ती’प्रमाणीकृत हर्बल अर्क’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘दैनंदिन आरोग्यामध्ये सुधारणा’ या उद्देशासह लॉंच करण्यात आलेल्या सावा हर्बल्सचे मालूर, कर्नाटक येथे स्थित अत्याधुनिक उत्पादन केंद्र आहे आणि आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देण्यासाठी आयुर्वेदाची शक्ती व उल्लेखनीय प्रगत फायटोटेक्नोलॉजीला एकत्र तिचा मनसुबा आहे.
आपले मत व्यक्त करत सावा ग्रुपचे अध्यक्ष विनोद रामचंद्र जाधव म्हणाले,”सावा हर्बल्स हे सावाच्या उच्च शुद्ध हर्बल अर्क उत्पादित करण्याच्या क्षमतेचे विस्तारीकरण आहे. भारतामध्ये ५००० वर्षांहून अधिक काळाची आयुर्वेदिक परंपरा आहे, जी अनेक पिढ्यांच्या माध्यमातून हस्तांतरित होत आली आहे. सावा हर्बल्सच्या माध्यमातून आमचा ग्राहकांना मूळ उपचार पद्धतींची ओळख करून देण्याचा मनसुबा आहे.”
अलिकडील काळात विविध आजारांचा उपचार किंवा व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षित व विश्वसनीय पद्धतींचा अवलंब करण्याप्रती लक्षणीय बदल दिसून आला आहे आणि कोविड-१९ महामारीच्या प्रादुर्भावानंतर लोक त्यांच्या आरोग्याप्रती अधिक जागरूक बनले आहेत. ही बाब लक्षात घेत सावा हर्बल्स सामान्य आरोग्य व आजारांसाठी हर्बल सोल्यूशन्सची रेंज देते.
”हर्बल ओटीसी बाजारपेठ धोरण व प्रोत्साहनदायी आराखड्याच्या निर्मितीसाठी आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या पुढाकारामुळे झपाट्याने विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्राहकांचा नैसर्गिक थेरेपींप्रती वाढता कल या विकासाला चालना देण्याची अपेक्षा आहे. आम्ही खात्री घेण्याची आशा करतो की, आमचे अंतिम ग्राहक सावा हर्बल्स व त्यांच्या उत्पादन ऑफरिंग्जकडे विश्वसनीय, विश्वासार्ह, नैसर्गिक व सुरक्षित पर्याय म्हणून पाहतील,” असे बिझनेस युनिटचे प्रमुख कार्तिक राजनम्हणाले.
सावा हर्बल्सने लॉंच केलेले सर्व ब्रॅण्ड्स इन-हाऊस विकसित करण्यात आले असून रूग्णांमधील वैद्यकीय कार्यक्षमता व सुरक्षिततेसाठी चाचणी करण्यात आले आहेत, जे अत्यंत लक्षणीय आहे. प्रत्येक हर्बल घटक त्याच्या आरोग्यविषयक लाभांसाठी काळजीपूर्वक निवडण्यात आले आहेत. गुरूसोल्व नॅच्युरल्स इन्क.सह सहयोगाने हे फॉर्म्युलेशन्स विकसित करण्यात आले आहे.
