Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महाविकास आघाडी संविधान मनात नसले तरी आम्ही संविधान मानतो – चंद्रकांत पाटील

पुणे : पाच राज्यांच्या निवडणुकांत बाबत निवडणूक आयोग निर्णय घेते. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांना संपूर्ण जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार असून अलीकडे त्यांना कोणीही सिरिअसली घेत नाही, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार संविधान मानत नसले तरी आम्ही संविधान मानतो, असा टोला लगावला आहे. तसेच विरोधकांना त्यांच्या सोईनुसार झालं की मग योग्य वाटतं, असेही म्हटंले आहे.

आज उत्तर प्रदेशसह गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि माणिपूर येथे निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर प्रचारासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. यावर संजय राऊत यांनी सर्वांना समान संधी द्या, असे म्हटंले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पाठपुरावा करावा 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं गिरीश बापट यांना पत्र आलं असून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नियोजित विमानतळ रद्द झाल्याचे या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या संदर्भात पुण्यातील सर्व वर्तमानपत्राचे संपादक खासदार गिरीश बापट ,महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित एक बैठक पार पडली. यामध्ये पुण्याचे खासदार गिरीश बापट व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत बैठक करावी करून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पाठपुरावा करावा, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading