Thursday, September 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस तर विदर्भात गारपीटीची शक्यता

पुणे : वातावरणात गारवा तसेच राज्यातील काही भागात ढगाळ वातवारण आहे. यातच हवामान विभागाने राज्यात आजपासून १० जानेवारीपर्यत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस तर दुसरीकडे रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या ८ आणि ९ जानेवारीला तुरळक भागात गारांचा पाऊस पडेल असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आयएमडी नेही वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळं बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना ८ जानेवारीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, ९ जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading