राज्यातील शाळां पाठोपाठ आता कॉलेजही ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळां पाठोपाठ आता कॉलेजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कृषी महाविद्यालये वागळतात उर्वरीत सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच ऑफलाईन महाविद्यालयं बंद राहणार असली तरी ऑनलाईन वर्ग सुरू राहणार असून परिक्षाही ऑनलाईनच घेतल्या जाणार आहेत. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू असणार आहे.
राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
उदय सामंत काय म्हणाले –
– राज्यातील अकृषी विद्यापीठासह इतर खासगी विद्यापीठांना हा निर्णय लागू असेल
– सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होतील
– परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर द्यावा
– महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद राहतील
– परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू राहतील
