पुणेकरांसाठी कठोर नियम; नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई
पुणे : पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ही दर 18 टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे पुण्यात कठोर नियमांची अमलबजावणी करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. यावेळी नियम न पाळल्यास आणखी कठोर निर्णय घेण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
आज पुण्यातील कोरोना परिस्थिती बाबद आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात कठोर नियम लावण्यात आले आहेत. तसेच नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहेत.
असे आहेत नवीन नियम –
नो वॅक्सीन नो एन्ट्री
लशीचे दोन्ही डोस घेतले तरच आता सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाईल. कोरोना लशीचे दोन डोस घेतले तरच हॉटेल, बार, शासकीय आणि खासगी ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवेश मिळणार नाही. हा नियम आधीपासून असला तरी याची कठोर अंमलबजावणी केली गेली नाही. आता मात्र याची अंमलबजावणी केली जाईल.
मास्क न घातल्यास 500 रुपये दंड
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क ही प्रार्थमिक गरज आहे. जर मास्क घातला नसेल तर 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे.
थुंकल्यास 1000 रुपये दंड
सार्वजनिक ठिकाणी मास्क नसेल आणि थुंकल्यास 1000 रुपये दंड आकरण्यात येणार आहे.
मध्यंतरीच्या काळात नागरिकांनी मास्क वापरणे बंद केले आहेत. मात्र आता केवळ कापडी मास्क न वापरता थ्री लेअर किंवा N95 मास्क वापराण्याचे आवाहन करणायात आले आहे. तसेच साधे मास्क सुरक्षित नसल्याचेही यावेळी अजित पवार यांनी अधोरेखीत केले.
जेष्ठ नागरिकांना 10 जानेवारीपासून बूस्टर डोस
देशातील कोरोना पॉझिटिव्ही रेट दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रंटलाईन वर्करर्सला बूस्टर डोस देण्यात येणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरूवात केली जाणार आहे.
